Friday, April 9, 2010

" सही तेवढी देऊन जा..."

आशीच चांगली वाटली कवीता म्हणून टाकलीय....!



अडगळीच्या खोलीमधलं
> दप्तर आजही जेव्हा दिसतं,
> मन पुन्हा तरूण
> होऊन
> बाकांवरती जाऊन बसतं.
>
>
> प्रार्थनेचा शब्द अन शब्द
> माझ्या कानामध्ये घुमतो,
> गोल करून डबा खायला
> मग आठवणींचा मेळा जमतो.
>
> या सगळ्यात लाल खुणांनी
> गच्च भरलेली माझी वही,
> अपूर्णचा शेरा आणि
> बाई तुमची शिल्लक सही.
>
> रोजच्या अगदी त्याच चुका
> आणि हातांवरले व्रण,
> वहीत घट्ट मिटून घेतलेत
> आयुष्यातले कोवळे क्षण.
>
> पण या सगळ्या
> शिदोरीवरंच
> बाई आता रोज जगतो,
> चुकलोच कधी तर तुमच्यासारखं
> स्वतःलाच रागवून बघतो.
>
> इवल्याश्या या रोपट्याची
> तुम्ही इतकी वाढ केली
> आहे,
> हमखास हातचा चुकण्याची
> सुद्धा
> सवय आता गेली आहे.
>
> चांगलं अक्षर आल्याशिवाय
> माझा हात लिहू देत नाही,
> एका ओळीत सातवा शब्द
> आता ठरवून सुद्धा येत नाही.
>
> दोन बोटं संस्कारांचा
> समास तेवढा सोडतो
> आहे,
> फळ्यावरच्या सुविचारासारखी
> रोज माणसं जोडतो आहे.
>
> योग्य
> तिथे रेघ मारून
> प्रत्येक मर्यादा ठरवलेली,
> हळव्या क्षणांची काही पानं
> ठळक अक्षरात गिरवलेली.
>
> तारखेसह पूर्ण आहे वही
> फक्त एकदा पाहून जा,
> दहा पैकी दहा मार्क
> आणि सही तेवढी देऊन जा.

"वडील..."

"वडील..."नावाचा एक अक्श्य्पानी ग्रन्थ घरात आसला की पानांची फडफड नुसती मोजायची। "
"समोरच्याला बोलणे"हा तर वडलार्जीत अधीकारच असतो या मंडलींचा ....!

रात्री गाद्या घातल्यावर मुलाबरोबर उशी मारून खेलताना...त्याला गुदगुदलय करून खोखो हसव्ताना
मील्नारा सातमजली आनंद ही मंडली घेतली का ?

बाथरूम मधून बाहेर आल्यावर " दीवा मलावला का ? " कींवा "गाड़ी नेहमी मेंन स्टैंडवर लावावी "
आशा आशयाची प्रकरणेही मंडली नेमाने आमच्यासमोर रीती करत आसतात...

"जनरेशन नावाची गँप "कुणा आँर्थोपेडीक कड़े जाऊंन मनाक्यतली गँप
कमी करतात तशी कमी करून मीलायाची सोय आसती तर कीती बर ज़आले आसते...!